Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

प्रकल्प लेखन

@ प्रकल्प लेखन @


1.  शैक्षणिक प्रकल्प,प्रकल्पासाठी लागणाऱ्या बाबी  व  कसा तयार करून घ्यावा.


       शालेय  प्रकल्प म्हणजे काय ?-

          विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा 

         एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले 

         वय,आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज 

         उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला  

         उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

  अ. प्रकल्पाची उद्दिष्टे-

 स्वयंअध्ययनाची सवय लागणे.

 स्व-कुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.

 स्वतःमध्ये उपजतच असणाऱ्या निरिक्षण,निवेदन,संकलन, सादरीकरण आदी क्षमताचा विकास      घडवणे. 

 तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.

कल्पकता,सृजनशीलता,संग्रहवृत्ती,श्रमप्रतिष्ठा,स्वयंशिस्त,चिकाटी,सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा   नीटनीटकेपणा,संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडविणे. 

 आत्मविश्वास प्राप्त करणे.

 या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्टे अभ्यासणे. उदा. भाषा विषय-उच्चतमशुद्धता,

 पाठांतर क्षमता,विचार मांडण्याची क्षमता इत्यादी

 ब. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे -

  प्रकल्प कार्य करणे जितके महत्वाचे आहे,तितकेच केलेल्या प्रकल्प कार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्वाचे आहे, कारण निवेदन,सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे हि प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्प कार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे, याचे मुद्धेसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे- 

 विद्यार्थ्यांसाठी- 

   1. प्रकल्पाचे नाव विषयासह-निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयाची निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.

   2. प्रकल्पाचा प्रकार- निवड केलेला प्रकल्प पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा-  सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प,तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.

   3. प्रकल्पाची  सुयोग्य उद्दिष्टे लिहा.

   4. प्रकल्पाचे साहित्य- विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखन साहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करावा.

   5. प्रकल्पाची कार्यपद्धती- प्रकल्प सकारात असताना कर्नुअत येणाऱ्या कृतीचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.

   6. प्रकल्पाचे निवेदन-  यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.

   7. प्रकल्पाचे सादरीकरण- संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदत्कार्याचाही उल्लेख करा.घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.

   8. आकृत्या व चित्रांकणासाठी- येथे प्रकल्पाशीसंबंधित चित्रे आकृत्या नकाशे चिटकवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.

   9. प्रकल्पपूर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद-यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.

   10. मूल्यमापन- यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते  ज्ञान प्राप्त झाले?

    11. प्रकल्पाबाबत स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पूर्ण करताना मिळालेल्या  स्व-आनंदाचा  उल्लेख एक दोन वाक्यात करा.

क. शालेय प्रकल्पासाठी यादी-

     1. माहीती संकलन - थोर संत, थोर समाजसुधारक,थोर राष्ट्रपुरुष,थोर शास्त्रज्ञ,थोर खेळाडू,थोर समाजसेवक,थोर समाजसेविका इत्यादी.

   2. संग्रह : म्हणी संग्रह, वाक्यप्रचार संग्रह, अभंगसंग्रह,  श्लोकसंग्रह,     

सुविचारसंग्रह,  कवितासंग्रह, भावगीतसंग्रह,  पोवाडासंग्रह,   समरगीतसंग्रह,  देशभक्तीपरसंग्रह,  गीते पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह इत्यादी

   3. प्रदर्शन : चित्रकलाकृती प्रदर्शन,ग्रंथप्रदर्शनपुस्तकेप्रदर्शन विज्ञान प्रकल्प प्रदर्शन विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.

   4. तक्ते : शालेय शैषणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी 

   5. आदर्श : आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका आदर्श महिला आदर्श गाव आदर्श शहर आदर्श राष्ट्र इत्यादी

📝शालेय  प्रकल्प  यादी 🌀

========================
---------'---------------------------------------

1) थोर संताची माहिती  मिळविणे2) थोर समाजसेवकांची माहीती 3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती 4) थोर समाजसेविकांची  माहिती5) आदर्श महिलांची माहिती 6) नामवंत खेळाडूंची माहिती 7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती 8) थोर शास्त्रज्ञांची माहिती 9) थोर विरांगनांची माहिती 10) श्रेष्ठ गायिकांची माहिती 11) श्रेष्ठ गायकांची माहिती 12) आदर्श शिक्षक 13) आदर्श शिक्षिका14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक 16) माझा भारत महान 17) थोरांचे विचार 18) थोर हुतात्मा 19) राष्ट्रीय स्मारके 20) राष्ट्रीय प्रतिके21 )प्राचीन मंदिर 22) ऐतिहासिक वाडे 23) महाराष्ट्रातील किल्ले 24) जलाशय  तलाव 25) धरणे 26) सरोवरे27) खनिज  संपत्ती 28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती 29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती30) औषधी वनस्पती 31) वाहतुकीचे नियम 32) वाहनांची घ्यावयाची दक्षता 33) माझे आवडते वाहन 34) रेल्वे स्टेशन 35) बसस्थानक 36) निबंध  कसा  लिहावा?37) विरामचिन्हांचा वापर  38) पत्रलेखन  कसे करावे ?39)कथा  कशी  सांगावी ?40) कथालेखन कसे करावे? 41) कवितांचा संग्रह 42) भावगीतांचा संग्रह  43) सारलेखन कसे  करावे ?44) मुद्यांवरून गोष्ट 45) चित्रमय गोष्ट 46) संवाद लेखन 47) वक्तृत्व कसे करावे ?48) नृत्यप्रकार ओळखणे 49) वाद्यांची ओळख 50) हुमाउपंथी मंदिरे 51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे 52) म्हणींचा संग्रह करणे 53) सुविचारांचा संग्रह करणे 54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे 56) श्लोकांचा संग्रह करणे 57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह  करणे58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह 59) 'आई' या विषयावरील  कवितांचा-गीतांचा संग्रह 60) गणितातील गमतीजमती61) आकाशवाणी 62) दूरदर्शन 63) वर्तमानपत्र64) प्रदर्शन खेळण्याचे65) प्राणिसंग्रहालय66) पशुसंग्रहालय67) पुरातनवस्तु संग्रहालय 68) भाजीपाला मंडई 69) किराणा दुकान 70) आपली वाहने 71) बियांचा संग्रह 72) जुन्या टिकिटांचा संग्रह 73) नाण्यांचा संग्रह 74) भेटकार्डांचा संग्रह 75) लग्नपत्रिकांचा संग्रह 76) निसर्ग चित्रांचा संग्रह 77) पिसांचा संग्रह 78) खेळण्यांचा संग्रह 79) मातीचे नमुने 80) खडकांचे प्रकार 81) दगडांचे नमुने 82) वैज्ञानिक खेळणी 83) शंख -शिंपल्यांचा  संग्रह 84) राख्यांचा संग्रह 85) दो-यांचा संग्रह85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह86) माझी शाळा 87)  फुलांच्या चित्रांचा संग्रह 88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह 89) विविध धर्मियांची प्रार्थना  स्थळे90) नूतन वर्षांभिनंदन91) भारतीय सैनिकांची  शौर्यगाथा92) आपला आवडता छंद93) आवडते पुस्तक  94) आवडता  लेखक 95) आवडता गायक 96) आवडती गायिका 97) आवडता चित्रकार 98) आवडते गीत 99) आपल्या  जवळचा मित्र 100) ग्रामदेवता

प्रकल्प लेखन प्रकल्प लेखन Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.