Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६ जानेवारी २०१९

भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध – २६ जानेवारी २०१९ 

भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण २६ जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटक संघटनेने राज्यघटनेचा (संविधान) स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. त्या दिवसापासून आपण एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनलो. दिनांक २६ जानेवारीची निवड करण्यात आली कारण १९३० मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीश भारत ब्रिटिश कॉमनवेल्थच्या दोन नवीन स्वतंत्र राजवटीत विभागला गेला, एक म्हणजे आपला भारत आणि दुसरा पाकिस्तान. भारत स्वतंत्र झाला असला तरी जॉर्ज सहावा भारताच्या संवैधानिक राजेशाहीचा प्रमुख होता आणि अर्ल माउंटबॅटन हा गव्हर्नर जनरल होता. या वेळी भारतकडे कायमस्वरूपी संविधान नव्हते, आपण भारत सरकार अधिनियम १९३५ ची सुधारित आवृत्ती वापरत होतो.
२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. ४ नोव्हेंबर १९४७ रोजी समितीने विधानसभे समोर पहिला मसुदा सादर केला. विधानसभेत २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत अनेक सत्रांमध्ये यावर चर्चा आणि सुधार होत राहिला. हे सत्र जनतेसाठी खुले होते. २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी मसुदा मान्य केला आणि संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रती काढल्या, ज्यापैकी एक हिंदी मध्ये होती आणि दुसरी इंग्रजी मध्ये. दोन दिवसांनी २६जानेवारी १९५० रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत गणराज्य बनले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले गेले.
संपूर्ण देशातल्या शाळा, शासकीय कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण आपले घर, ऑफिस, गाडी तिरंगी रंगाचे फुगे, झेंडे, रांगोळी इत्यादीनी सुशोभित करतो. काही जण प्रजासत्ताक दिन घरी साजरा करतात तर कोणी सामाजिक मोहिमा आणि कार्यक्रमांसह साजरे करतात. शाळेच्या मैदान / कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो; उत्सवपूर्ण मोर्चे काढले जातात, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुख्य अतिथी विद्यालय / महाविद्यालयाच्या आवारात ध्वज वंदनासाठी येतात, अनेक सन्मानित व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना उपस्तीथी लावतात. ध्वजवंदना नंतर राष्ट्रगीत गायले जाते, सर्व जण राष्ट्रगीतासाठी उभे राहून त्याचा आदर राखतात. अतिथी, शिक्षक आपले भाषण देतात. काही शाळा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.
भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या समोर भारत सरकार राजधानी दिल्लीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिन साजरा करते. या दिवशी, राजपथावर भव्य परेड होते जी भारतीय संस्कृती, वारसा आणि संरक्षण क्षमता दाखवून देते. शेकडो लोक राजपथला भेट देतात आणि या राष्ट्रीय उत्सवाचा आनंद घेतात. दूरदर्शन, विविध वृत्तवाहिन्यां आणि आजकाल यूट्यूब, फेसबुक वर हा उत्सव प्रसारित केला जातो. राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाला संबोधित करतात.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे अतिथी म्हणून विविध देश, सरकारच्या प्रमुखाना आमंत्रित केले जाते. वर्ष २०१८ साठी भारत ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या १० आसियान देशांच्या राज्य किंवा सरकारच्या प्रमुखांना आमंत्रित करीत आहे.
भारतीय संविधान किंवा घटना ही प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा आराखडा, शासकीय संस्थांच्या संरचना, कार्यपद्धती, शक्ती आणि कर्तव्ये प्रस्थापित करते. सोबत भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देशक तत्त्वे आणि कर्तव्यांची स्थापना करते. संविधानानुसार भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जो न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्याचा प्रयत्न करतो.
संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि शिक्षण हक्क, घटनेतील उपाय हे आपले ६ मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत कर्तव्ये सर्व नागरिकांना संविधानासह भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा आदर करण्यास, त्याच्या वारसाचे संरक्षण करणे, त्याची संमिश्र संस्कृती जतन करणे आणि त्याच्या संरक्षणास सहाय्य करण्यासाठी बाध्य करते. ते सर्व भारतीयांना सामान्य बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी, वैज्ञानिक स्वभाव विकसित करण्यासाठी, हिंसेला आळा घालण्यासाठी बांधील करते.
*********************************************************************

भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण – २६ जानेवारी २०१९ मराठी मध्ये (Republic Day Speech in Marathi)

अध्यक्ष महाशय, पुज्य गुरुजन वर्ग, आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रानो, सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या ६९व्या प्रजासत्ताक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मला या भाषणाच्या स्पर्धेत सहभाग होण्याची परवानगी दिल्याबद्दल आपल्या प्रेरणास्थान प्राचार्य मॅम यांचे मी आभार व्यक्त करतो/करते. भाषणाच्या तयारीसाठी मला मिस सुवर्णा यांचे आभार मानायला आवडेल.
आज मी फक्त भारतीय प्रजासत्ताक दिनाबद्दलची माहिती देणार नाही, तर आज मी आपल्या संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार आणि आपली संविधानिक कर्तव्ये यांच्याबद्दल बोलणार आहे.
आज आपण भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि मला हे सांगायला खूप वाईट वाटते कि, हजारो भारतीय नागरिक अजूनही भारताच्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरक ओळखत नाहीत. आपल्याला या स्वातंत्र्याची, मूलभूत हक्कांची किंमत राहिली नाही का? हजारो स्वातंत्र्यसेनानी या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले, त्यांनी आपल्या कुटुंबाचे, जीवाचे बलिदान दिले, जेणेकरून भारताची पुढची पिढी स्वतंत्र देशात जन्म घेईल. हाच तो त्यांचा स्वप्नातला भारत का, आणि हेच त्यांच्या स्वप्नातले भारतीय नागरिक का?
जे लोक फरक ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी क्रूर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तरीही, आम्ही ब्रिटिश कॉमनवेल्थचे भाग होतो. आपल्याकडे आपले स्वतःचे संविधान (राज्यघटना) नव्हते. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी महान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने एक प्रचंड आव्हान उचलले. दोन वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली, आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले. संपूर्ण जगामध्ये हे प्रदीर्घ संविधान आहे.
संविधानाने आपल्याला शिक्षण, भाषण, गोपनीयता आदी जीवनावश्यक मूलभूत अधिकार दिले. भाषणाच्या अधिकाराशिवाय मी आज येथे भाषण देऊ शकलो नसतो. आपण संवैधानिक अधिकारांसाठी लढतो, तक्रार करतो, पण आपल्या संवैधानिक कर्तव्यासाठी कोणीही लढा देताना दिसत नाही. जे अज्ञानी आहेत, मी त्यांना असे सांगू इच्छितो की आपल्याला नागरिक म्हणून संविधानात जे हक्क दिले जातात तसेच आपली कर्तव्ये देखील संविधान निर्दिष्ट करते. आपण इतके अज्ञानी आहोत की आपल्याला हे माहित ही नाही की आपली काही घटनात्मक कर्तव्ये सुद्धा आहेत.
आज, ६९व्या प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्ण समयी संकल्प करूयात की आपण आपल्या संविधानाचा अभ्यास करू, त्याचा आदर करू. हजारो स्वतंत्र सेनानी आणि डॉ.आंबेडकरांच्या बलिदाचे, मेहनतीचे चीझ करूयात. आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढा देताच राहायचे आहे पण सोबत आपली राष्ट्रीय कर्त्यवे सुद्धा निभावली पाहिजेत.
पुन्हा एकदा मी आपल्या प्रमुख महोदयाचं आभार व्यक्त करू इच्छितो.
माझ्याबरोबर म्हणा .. भारत माता की … जय (३ वेळा) .. वंदे … मातरम् … (३ वेळा)
धन्यवाद


********************************************************************

प्रजासत्ताक दिन २०१९ चारोळ्या, शुभेच्छा, कविता

या चारोळ्या आम्ही स्वतः लिहल्या आहेत, जर त्या तुम्हाला आवडल्यात तर आम्हाला नक्की कळवा..
मतभेद सारे विसरुया,
बंधने सारी तोडूया,
एक मनाने, एक भावनेने
आज परत एकत्र येऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊयात प्रण हा एक मुखाने….
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

जात, धर्म, रंग, वेष
वर वरचे फरक सारे
फक्त तिरंग्याचा धर्म, जात, रंग खरा
चला आज पुन्हा एकत्र येऊ सारे…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

चला करूयात या
संविधानाचा आदर आज,
ज्याने दिला आपणास
जगण्याचा, शिकण्याचा अधिकार…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….


**********************************************************************



२६ जानेवारी : गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी


प्रजासत्ताकदिन म्हणजे राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव करुन देणारा राष्ट्रीय सण !भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात. राज्य सरकार या हक्कांचे संरक्षण करण्यास असमर्थ असेल किंवा त्याचे उल्लंघन केल्यास न्यायपालिकेमार्फत आपल्याला न्याय मागता येतो.
राज्यघटना तयार करणार्‍या समितीने मुलभूत अधिकाराचा भारतीय राज्यघटनेत समावेश करून घेण्यासाठी तत्कालीन अनेक लोकशाही देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. उदाहरणार्थ, अमेरिका, ब्रिटन इत्यादी. त्यानंतर राज्यघटनेच्या परिशिष्ट १४-१५-१९-२०-२१ मध्ये या मुलभूत अधिकारांचा समावेश करण्‍यात आला व त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेकडे सुपूर्द केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांनी राज्य घटनेच्या ९ व्या कलमात दुरूस्ती करून राज्य सरकारने निर्माण केलेल्या कायद्यामुळे एखाद्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येणार नाही म्हणून अशा कायद्यांचा राज्यघटनेच्या ९ व्या परिशिष्टात समावेश केला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर राज्य सरकारने तयार केलेल्य एखाद्या कायद्यामुळे या अधिकारांचे हनन होत असेल तर न्यायपालिका ९ व्या परिशिष्टात असलेला कायदा बरखास्त करू शकते असेही सांगण्यात आले होते.
देशात १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्‍यात आली होती. तेव्हा हाच प्रश्न उपस्थित झाला होता. तत्कालीन सरकारने आणीबाणीची घोषणा करून मुलभूत अधिकारावर बंधने आणली होती. तसेच, देशाअंतर्गत सुरक्षेचे कारण सांगून लाखो लोकांना अटक केली होती.
त्यावेळी या कायद्याअंतर्गत अटक केलेल्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने राजकीय वाद, हा कायद्याशी सुसंगत नसल्याचे सांगून त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. कदाचित केंद्र सरकारप्रती धर्मनिष्‍ठा किंवा भीती हे एक कारण असू शकते.
काही अधिकार देण्यास अडचणी निर्माण होतील म्हणून घटनाकारांनी सरकारला अधिकार देण्‍याचा हक्क दिला होता. स्वातंत्र्यानंतर देशाची प्रशासन व्यवस्था मजबूत नव्हती. त्यामुळे या अधिकाराचा सक्षमरीत्या वापर करू शकले नाहीत. म्हणून घटनाकारांनी काही महत्त्वाच्या अधिकाराला मार्गदर्शक तत्त्वे सांगून सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. स्वातंत्र्यानंतर येणार्‍या १०-१५ वर्षांत हे अधिकार नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते.
मार्गदर्शक तत्त्वात मानले गेलेले अधिकार कल्याणकारी होते. लोकशाही देशात, नागरिकांच्या मुलभूत अधिकाराप्रमाणे होते. केवळ सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्याचे बंधन होते. सरकार या मार्गदर्शक तत्त्वांची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल.
मुलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालय व मानव अधिकार आयोग शक्तीशाली मानले जातात. अनेकवेळा या संस्थांनी मानवाच्या मुलभूत अधिकारासंबंधी काही महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. परंतु, सामान्य लोकांवाटते की या संस्था उच्चवर्गीयांना जास्त महत्त्व देतात आणि हे राज्य घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराच्या विरूद्ध आहे.
नागरिकांच्या प्राथमिक गरजेनुसार शिक्षण, पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रदुषणमुक्ती इत्यादी जे मानवाधिकार किंवा मुलभूत गरजा आहेत. त्यांना स्वातंत्र्यानंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० ला राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यापासून येत्या १५-२० वर्षात मुलभूत अधिकाराचा दर्जा दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, यासाठी प्रयत्न करण्‍याचे दूरच पण हे अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने काही विशेष असे प्रयत्नही केले नाहीत.

*******************************************************************************************


२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन


२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन
देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो २६ जानेवारीला.
हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.
१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.
दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.
**********************************************************************************************************************

सर्वांत मोठ्या लोकशाही प्रजासत्ताकाचा सोहळा, २६ जानेवारी



प्रजासत्ताक दिन सोहळा
२६ जानेवारी. भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिनांक. या निमित्ताने नवी दिल्लीत पार पडणारा प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा आणि एकूणच रायसीना टेकडीजवळील राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्स, संसद भवन, रेल भवन, वायूसेना भवन ते इंडिया गेट असा संपूर्ण परिसर, या सर्वांशी माझे विशेष नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच माझ्या संगणकाच्या आणि मोबाईलच्या डेस्कटॉप बॅकग्राऊंडवर पहिल्यापासून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील वेगवेगळी छायाचित्रेच ठेवण्याची इच्छा झाली आणि ती मी आजपर्यंत पूर्ण करत आलेलो आहे. ती छायाचित्रेही केवळ पीआयबीचीच. १९९५ पासून दरवर्षी न चुकता २६ चे संचलन आणि २९ चे बिटींग रिट्रीट दूरदर्शनवर किंवा प्रत्यक्ष नवी दिल्लीत जाऊन पाहत आलेलो आहे. या दोन कार्यक्रमांसाठी सर्व कामे बाजूला ठेऊन (अगदी नोकरीतूनही) वेळ काढत आहे आणि पुढेही असाच काढत राहीन. जेव्हाजेव्हा दिल्लीला जाण्याची संधी मिळाली, तेव्हातेव्हा या परिसरालाही आवर्जून भेट द्यावीशी वाटली ती यामुळेच. वर्षभर केवळ याच सोहळ्याची प्रतीक्षा असते आणि अगदी काऊंटडाऊनही सुरू असते.
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी/ऐकण्यासाठी माझी पहिल्यापासूनच पहिली आणि शेवटची पसंती आहे दूरदर्शन आणि आकाशवाणीला. कारण अतिशय उद्बोधक, उत्साहवर्धक आणि शुद्ध भाषेतून इथेच समालोचन ऐकता येते. अन्य वाहिन्यांसारखा उथळपणा, आरडाओरडा अजिबात नसतोच येथे. खासगी वाहिन्यांना स्वतःच्या कॅमेऱ्यांमधून या सोहळ्याचे थेट प्रसारण करण्याची परवानगी नाही. म्हणूनच या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात राष्ट्रीय भावना, बाजारू मानसिकतेचा अभाव आणि काही गांभीर्यही आजपर्यंत टिकून राहिले आहे.
गेली २१ वर्षांपासून प्रत्येक वर्षी अगदी मनापासून हा सोहळा अनुभवत आहे. या सोहळ्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेतून, निरीक्षणातून या संपूर्ण सोहळ्याविषयीची माहिती गोळा करण्याची सवय लागली. त्यातून या सोहळ्यातील छोट्या-मोठ्या घडामोडींसह त्यातील बदलांसंबंधीचीही मी जमविलेली माहिती आज ९-१० हजार शब्दांच्या आसपास पोहचली आहे. त्यातीलच काही भाग यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पुढे देत आहे. जगातील सर्वांत मोठ्या प्रजासत्ताक, लोकशाहीच्या सोहळ्याची ही शाब्दिक झलक...
-- यात यंदाच्या संचलनातील बदलांचा उल्लेख केलेला नाही. --
----०-०-०-०----

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन

राजधानी नवी दिल्लीत दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे भव्य संचलन पार पडते. हे संचलन राष्ट्रपती भवनाजवळील विजय चौकापासून ऐतिहासिक लाल किल्ल्यापर्यंत जाते. गेल्या ६६ वर्षांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची ओळख ‘जगातील सर्वांत भव्य आणि विविधरंगी संचलन’ अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे हे संचलन देशी-विदेशी पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण ठरत आहे. हे संचलन म्हणजे भारताची लष्करी क्षमता, इतिहास, संस्कृती, परंपरा, विविध क्षेत्रांमधील प्रगती यांची थोडक्यात ओळख करून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन असते. त्याचबरोबर नागरिकांना आपले हक्क, कर्तव्ये, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता इत्यादी बाबींचीही जाणीव पुन्हा करून देण्याची संधी प्रजासत्ताक दिन उपलब्ध करून देत असतो.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा इतिहास
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू होऊन भारत एक सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक बनला. कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारताचा राज्यकारभार खऱ्या अर्थाने भारतीयांकडून पाहिला जाऊ लागला. प्रौढ मताधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही यांसारख्या नवनवीन संकल्पनांशी भारतीयांची ओळख होत गेली. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून १९५० पासून दरवर्षी २६ जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिन पाळला जातो. त्या निमित्ताने देशातील मुख्य सोहळा २६ ते २९ जानेवारीदरम्यान नवी दिल्लीमध्ये पार पडतो. या काळात भारताच्या सार्वभौमत्वाची प्रतीके असलेल्या राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, साऊथ व नॉर्थ ब्लॉक यांसारख्या महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई केली जाते.

२६ जानेवारी १९५० रोजी पहिले प्रजासत्ताक दिनाचे संचलन नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये पार पडले होते. त्यानंतर आयर्विन स्टेडियम, रामलीला मैदान, लाल किल्ला अशा ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे संचलन आयोजित करण्यात आले होते. १९५५ पासून त्याचे एक ठिकाण निश्चित करून ते राजपथावर आयोजित करण्यात येऊ लागले. सुरुवातीला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संचलन आणि काही ठराविक कार्यक्रमांपुरताच मर्यादित होता. कालांतराने त्याची व्याप्ती वाढत गेली. तसेच सुरुवातीला केवळ लष्कराचाच या संचलनात सहभाग असे. पुढे पं. नेहरुंच्या इच्छेवरून त्यात सांस्कृतिक पथकांचाही समावेश करण्यात आला.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यामागील उद्देश
1. भारतात प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये भव्य सोहळा साजरा करण्यामागील उद्देश भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला, त्या ऐतिहासिक घटनेची आठवण ठेवणे हा आहे. २६ जानेवारी १९५० पासून भारताचा राज्यकारभार भारताच्या राज्यघटनेनुसार भारतीयांकडूनच पाहिला जाऊ लागला.
2. अनेक शतकांच्या गुलामीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झाला. त्यानंतर थोड्याच काळात भारतीय राज्यघटना तयार होऊन तिची अंमलबजावणी सुरू होऊन भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण ठेऊन भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमागील प्रेरणा, इतिहास यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या हेतूने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जातो.
3. भारतात धर्म, संस्कृती, वंश, परंपर, जाती इत्यादी वैविध्य असल्याने तो एक बहुरंगी देश म्हणून ओळखला जातो. अशा देशातील सर्व नागरिकांमध्ये एकोपा, एकीची भावना निर्माण होऊन त्यांना आपापसांत देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यातून राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले शांततामय सहजीवन प्रस्थापित व्हावे, तसेच राष्ट्र उभारणीत आणि देशांच्या सीमांचे संरक्षण करण्यात अमूल्य योगदान देणाऱ्या नागरिकांच्या/लष्करी-निमलष्करी दलांचा सन्मान करण्याच्या हेतूने प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
4. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला काही हक्क प्रदान केले आहेत, तर त्याचवेळी राष्ट्र आणि समाजाप्रती नागरिकांची कर्तव्येही सांगितलेली आहेत. त्याबाबत तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते.
5. प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील मुख्य भाग असलेल्या लष्करी आणि सांस्कृतिक पथकांच्या संचलनाच्या माध्यमातून देशाची लष्करी शक्ती व सांस्कृतिक शक्ती जगासमोर मांडली जाते. त्यातून भारताच्या लष्करी तयारीविषयी थोडक्यात माहिती दिली जाते.

सोहळ्याची तयारी
प्रजासत्ताक दिनाच्या साहळ्याची तयारी विविध मंत्रालयांकडून ६ महिने आधीपासून सुरू होते. देशातील घटकराज्ये आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या चित्ररथांची निवडप्रक्रिया नोव्हेंबरमध्ये पूर्ण होते. त्याचवेळी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरांसाठी निवडप्रक्रिया देशभरात राबविली जाते. त्याचदरम्यान संचलनात सहभागी होणाऱ्या दिल्लीतील शाळांच्या विद्यार्थ्यांची निवड होते. या सर्व पथकांचा डिसेंबरपासून नवी दिल्लीतील राजपथावरसराव सुरू होतो.

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विविध कार्यक्रम
२६ जानेवारीला राजपथावर होणारे संचलन म्हणजेच नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा असे सामान्यपणे मत आढळते. पण या सोहळ्यात अन्य विविध कार्यक्रमांचाही समावेश असतो. या निमित्ताने नवी दिल्लीत केंज्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडून/विभागांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. २४ ते २९ जानेवारीदरम्यान ‘लो कतरंग राष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव’ आयोजित केला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाल्यावर देशभरातीन आलेले कलाकार आपापल्या क्षेत्रातील पारंपारिक लोकनृत्यांचे सादरीकरण या महोत्सवात करतात. त्याचबरोबर ‘राष्ट्रीय संगीत संमेलन’ तसेच आकाशवाणीतर्फे ‘राष्ट्रीय सर्व भाषा कवी संमेलन’ आयोजित केले जाते. दिल्ली साहित्य अकादमी ‘राष्ट्रीय हास्यकवी संमेलन’ भरविते. अलीकडे भारतीय टपाल खातेही ‘प्रजासत्ताक दिन टपाल तिकीट रेखांकन स्पर्धा’ भरवित आहे. मनुष्बळ विकास मंत्रालयाच्या सहकार्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) देशातील आणि देशाबाहेरील भारतीय शाळकरी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करते.

नागरिकांमध्ये विविध विषयांबाबत जागृती निर्माण व्हावी या हेतूने माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांसाठी सोशल मीडियावर विशिष्ट विषय देऊन स्पर्धा आयोजित करते. त्यात विविध गटांमधून आपल्या कौशल्याचे सर्वात्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या स्पर्धकांना राजपथावरील प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्यासाठी खास निमंत्रण दिले जाते.
एनसीसी व एनएसएसची शिबिरे
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जानेवारीमध्ये दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांची महिन्याभराची ‘प्रजासत्ताक दिन शिबिरे’ भरविली जातात. या शिबिरांसाठी देशाच्या विविध भागांमधून विशेष निवडप्रक्रियेतून सुमारे दोन-दोन हजार छात्र येत सतात. भारताच्या समृद्ध कला-परंपरा, संस्कृती यांची युवकांना ओळख व्हावी, त्यांच्यात संवाद वाढावा आणि यातून राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लागावा असा हेतू या आयोजनांमागे असतो आणि तो बऱ्याच प्रमाणात साध्यही होतो. . या शिबिरांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छात्र व स्वयंसेवकांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होत असते.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय शौर्य गाजविलेल्या १६ वर्षांखालील मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या आधी विविध प्रकारचे ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ जाहीर केले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५७ मध्ये झाली. भारतीय बाल कल्याण परिषद या पुरस्कारांची घोषणा करते.

राष्ट्रपतींचा संदेश आणि विविध पुरस्कारांची घोषणा
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून संदेश देतात. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या विविध सेवांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार/सन्मान जाहीर करतात. त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे,
• लष्करी सन्मान - परम वीर चक्र, अशोक चक्र, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक इत्यादी.
• राष्ट्रपती पोलीस पदक
• प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक
• नागरी सन्मान - भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री.
• इत्यादी

परदेशी प्रतिनिधींची भेट
प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने भारतातील विविध देशांच्या राजदुतांसाठी २३ जानेवारीला सायंकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींकडून ‘स्वागत समारंभ’ आयोजित केला जातो. परदेशांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद या समारंभातून साधला जातो.

प्रजासत्ताक दिनाचे संचलन
राष्ट्रपती भवनाजवळील विजय चौकापासून सुरू होऊन लाल किल्ल्यापर्यंत जाणारे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे या सोहळ्यातील महत्त्वाचे अंग आहे. पूर्वी या दोन ठिकाणांपर्यंत हे संचलन १३ किलोमीटरचे तर कापत असे. मात्र १३ डिसेंबर २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संचलनाच्या मार्गात बदल करून हे अंतर ८ किलोमीटरपर्यंत कमी करण्यात आले.

समाली मंच आणि आसपासचा परिसर
राजपथाच्या मध्यावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि प्रमुख पाहुणे यांच्यासाठी सलामी मंच उभारला जातो. त्याच्या भोलतीने राजदुतांबरोबरच सर्व खासदार, राजदूत, प्रमुख पाहुण्यांबरोबर आलेले प्रतिनिधी, सामान्य नागरिक इत्यादींसाठी विशेष दीर्घा उभारल्या जातात. सलामी मंचाबरोबरच सजलेला राजपथ आणि संपूर्ण राजपथावर फडफडणारे राष्ट्रध्वज समारंभाला उत्साहवर्धक बनवितात. मागील वर्षात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील १०० शाळकरी विद्यार्थांना पंतप्रधानांच्या खास दीर्घेत बसून संचलन पाहण्यासाठी निमंत्रित केले जाते.

शहिदांना आदरांजली
संचलनाच्या सुरुवातीला इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे देशाच्या सीमांचे संरक्षण करताना शहीद झालेल्या लष्करी जवानांना पंतप्रधान संपूर्ण देशाच्या वतीने आदरांजली वाहतात. १९७१ मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामानंतर इंडिया गेट येथे अमर जवान ज्योती उभारण्यात आली होती. त्यानंतर ही प्रथा १९७२ पासून सुरू झाली.

संचलनासाठी प्रमुख अतिथी
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून एखाद्या देशाच्या प्रमुखाला बोलाविण्याची प्रथा आहे. भारताच्या परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने या प्रथेला महत्त्व असते. संबंधित वर्षात ज्या देशाशी भारताचे संबंध प्राधान्याने विकसित केले जाणार असतात, त्या देशाच्या प्रमुखाला भारताचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करत असतात. ही प्रथा २६ जानेवारी १९५१ पासून सुरू झाली. त्यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो यांना प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथावर सुरू झाल्यावर १९५५ पासून प्रमुख अतिथी म्हणून अधिकृतरित्या एखाद्या देशाच्या प्रमुखाला किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी पाकिस्तानचे गव्हर्नर-जनरल मलिक गुलाम महंमद हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी होते. २०१६ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्क्वा ओलांद यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाला आतापर्यंत फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी १९७६, १९८०, १९९८, २००८ आणि २०१६ असे सर्वांत जास्त वेळी निमंत्रित करण्यात आले आहे.

लष्करी सन्मान प्रदान
राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथींबरोबरच अन्य सर्वांचे सलामी मंचावर आगमन होऊन ध्वजारोहण झाले की राष्ट्रपतींच्या हस्ते नुकत्याच जाहीर झालेल्या लष्करी सन्मानांचे विरतण होते. संचलनाच्यावेळी केवळ परम वीर चक्र आणि अशोक चक्र या सन्मानांचेच वितरण होते. अन्य सन्मान प्रदान करण्यासाठी मार्च/एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात विशेष समारंभ आयोजित केला जातो.

मुख्य संचलन
लष्करी सन्मान प्रदान केल्यावर राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे मुख्य संचलन सुरू होते. यात सुरुवातीला येणाऱ्या शस्त्रसामग्री आणि संचलन पथकांमधून भारताची लष्करी ताकद दाखविली जाते. भारतातील परराष्ट्रांच्या राजदूत आणि लष्करी प्रतिनिधींसमोर या संचलनाच्या माध्यमातून काही शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले जाते. अशा प्रकारच्या प्रदर्शनाला विशेष महत्त्वही असते. कारण त्यातून परराष्ट्रांना योग्य तो संदेश पोहचविणे शक्य होते. उदाहरणार्थ, सन २०१३ मध्ये संचलनात ५००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राचे प्रथमच प्रदर्शन करण्यात आले होते. या प्रदर्शनाची चीनने तातडीने दखल घेऊन त्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली होती. संचलनादरम्यान भारत विकसित करत असलेल्या आणि लवकरच लष्करात दाखल होण्याची शक्यता असलेल्या शस्त्रास्त्रांचेही याच हेतूने प्रदर्शन केले जाते.

संचलन पथकांपाठोपाठ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचेही प्रदर्शन चित्ररथ आणि अन्य सांस्कृतिक पथकांच्या माध्यमातून घडविले जाते.
मान्यवरांसाठी ‘स्वागत समारंभ’
संचलनानंतर सायंकाळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व मंत्री, खासदार, भारताचे सरन्यायाधीश, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, प्रमुख अतिथी यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींकडून ‘स्वागत समारंभ’ (ॲट होम) आयोजित केला जातो. चहापानाचा हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींसाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि अन्य महत्त्वपूर्ण पदांवरील व्यक्तींच्या अनौपचारिक गाठीभेटी घेण्याचे माध्यम असते.

संचलनानंतरचा दुसरा दिवस
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी संचलनाचील सर्व कलाकार, एनसीसी व एनएसएस शिबिरांमधील छात्र यांच्या भेटीचा खास समारंभ राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो. उपराष्ट्रपती, पंतप्रधानही त्यानंतर या सर्वांच्या भेटी घेतात. यामुळे देशाच्या अतिशय दूरवरच्या भागातून आलेल्या सामान्य व्यक्तीलाही एवढ्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची संधी मिळत असते आणि ही बाब त्या व्यक्तींसाठी निश्चित प्रेरणादायी ठरत असते.

पंतप्रधानांची एनसीसी रॅली
एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराचा औपचारिक समारेप ‘पंतप्रधानांच्या रॅली’ने २८ जानेवारीला होतो. त्यामध्ये एनसीसचे छात्र आणि मित्रदेशांमधून आलेल्या छात्रांची प्रात्यक्षिके होतात. या शिबिरात पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एनसीसीच्या निदेशालयांना विविध सन्मान दिले जातात. यावेळी पंतप्रधान आपल्या संबोधनातून छात्रांना भावी जीवनात उपयोगी ठरेल असा संदेश देतात.

बिटींग द रिट्रीट
राजधानीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारेप २९ जानेवारीला सायंकाळी ‘बिटींग द रिट्रीट’ या समारंभाने होतो. नवी दिल्लीतील विजय चौकात होणाऱ्या या समारंभात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित असतात. हा समारंभ पहिल्यांदा १९५२ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या समारंभात लष्कराच्या तिन्ही दलांची बँडपथके संगीत सादर करतात.
प्राचीनकाळी सूर्यास्त झाल्यावर शंखनाद करून सूर्योदयापर्यंत युद्ध थांबविण्याची भारतात प्रथा होती. शंखनादानंतर युद्धभूमीवरील ध्वज उतरविले जात आणि सैनिक आपल्या मृत साथीदारांना घेऊन बराकींमध्ये परतत असत. त्यावेळी ते विविध प्रकारच्या धून वाजवित जात असत. अशा प्रकारच्या प्रथेचे उल्लेख महाभारतातही आढळतात. ही परंपरा सतराव्या शतकात युरोपात गेल्यावर तिला सध्याच्या ‘बिटींग द रिट्रीट’चे स्वरुप आले.

संचलनातील पथकांना पुरस्कार
संचलनानंतर ३-४ दिवसांनी संरक्षण मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या पथकांना पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये लष्करी आणि निमलष्करी दले, चित्ररथ, शाळकरी मुलांची नृत्यपथके यांचा समावेश असतो. हे पुरस्कार १९८७ मध्ये सुरू करण्यात आले होते.

विविध राज्यांमधील कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील मुख्य कार्यक्रम संबंधित घटकराज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपालांच्या हस्ते पार पडतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संबंधित घटकराज्यांचे राज्यपाल राज्यातील जनतेला उद्देशून संदेश देतात. त्याचप्रमाणे सर्व जिल्हा मुख्यालये आणि अन्य महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये तसेच विविध संस्था-संघटनांकडूनही सार्वजनिकरित्या या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मात्र नवी दिल्लीतील मुख्य सोहळ्याइतके त्याचे व्यापक स्वरुप नसले तरी उत्साह तसाच असतो.

भारताच्या दुतावासांमधील समारंभ
भारताचा प्रजासत्ताक दिन जगातील विविध देशांमध्ये असलेल्या भारताच्या राजदुतावासांबरोबरच वाणिज्य दुतावासांमध्येही साजरा केला जातो. त्यावेळी संबंधित देशांमधील भारताचे राजदूत/वाणिज्यदूत यांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवितात.

एकूणच प्रत्येक टप्प्यावर जाणविणारा वक्तशीरपणा, भारतीय कला-परंपरा आणि संस्कृतीच्या विविध रंगाची उधळण, मतभेद बाजूला जाऊन सोहळ्यातील प्रत्येक सहभागी व्यक्तींमध्ये निर्माण झालेला उत्साह, ऐक्याची भावना आणि शिस्त ही प्रजासत्ताक दिन सोहळ्याची खास वैशिष्ट्ये ठरलेली आहेत. हा सोहळा जगाला भारताचे सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्य दाखविण्याचे साधन ठरत असतो, तसेच तो वैविध्यपूर्ण भारतीय समाजात ऐक्य निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी हातभार लावण्याचेही साधन ठरतो. नवी दिल्लीत चित्ररथांचे कलाकार, एनसीसी व एनएसएस शिबिरांमधील छात्र, लष्करी सरावपथके यांचे महिनाभर वास्तव्य असते. त्यावेळी देशाच्या विविध भागांमधून आलेल्या त्या कलाकारांमध्ये देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळते. जगातील सर्वांत मोठ्या प्रजासत्ताकाच्या या भव्य सोहळ्यात भारताच्या ‘प्रथम नागरिका’पासून अगदी सामान्यातील सामान्य नागरिकाचाही सहभाग असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘भारतीय प्रजासत्ताकाचा सोहळा’ ठरतो आहे.
**************************************************************************************


भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६ जानेवारी २०१९ भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण  – २६ जानेवारी २०१९ Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.