Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

अभ्यास कसा करावा ?


दहावीचे वर्षभर आणि विशेषतः आता परीक्षा जशी जवळ येईल , तशी घरातील वडिलधारी माणसे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या असंख्य सूचनाही सुरू असतात. त्याचा राग येऊ लागतो आणि अशा त्रासिक मूडमध्ये अभ्यासात लक्ष लागत नाही ; पण वडिलधाऱ्यांच्या या वागण्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा. आपली आई तिची सर्व कामे करूनही न दमता आपल्यासाठी कायम दिवस-रात्र उपलब्ध असते. आईने तिचा दिनक्रम आपल्या अभ्यासाच्या वेळेला पूरक बनवला आहे. तुम्हाला चांगले मार्क मिळावे , यासाठीच तिची तळमळ आहे , असा विचार करा आणि प्रसन्न मनःस्थितीत शांतपणे अभ्यासाला बसा. तुमचा अभ्यास चांगला होईलसलग तीन-चार तास किंवा दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करू नका. दर तास-दीड तासाने आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करा. पहाटे लवकर किंवा रात्री जागून , यापैकी जे सोयीचे असेल , त्यानुसार वेळ ठरवा. पालकांनीही अभ्यासाच्या वेळेचा आग्रह धरू नये. या काळात आहार संतुलित ठेवा. संतुलित म्हणजे सॅलड , कडधान्ये , सूप असेच काही नाही. रोजचेच जेवण ; पण जिभेसाठी जेवू नका. थोडक्यात , जेवल्यावर झोप येईल , असे चमचमीत पदार्थ , पक्वान्ने शक्यतो टाळा. वेळच्या वेळी ; पण मोजके आणि नेहमीचे जेवण करा. हॉटेलांतील अन्न शक्यतो टाळाच. विषय बदला. विषय बदलण्यापूर्वी दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. त्यामध्ये आपल्या आवडीचे उदाहरणार्थ , गाणी ऐकणे , टीव्ही पाहणे , आई-वडिलांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे , कम्प्युटर गेम खेळणे असे काहीही करू शकाल. मात्र , हा ब्रेक दहाच मिनिटांचा असेल , याची काळजी घ्या. पुन्हा अभ्यासाला बसताना सुरुवातीच्या पाच-सात मिनिटांत आधी तास-दीड तासात काय अभ्यास केला , याची उजळणी करून पाहा. त्यातील किती लक्षात राहिले आहे , याचा अंदाज घ्या आणि मगच नवीन विषयाची सुरुवात करा. परीक्षेमध्ये जरी पाचपैकी कोणतेही चार सोडवा , असे ऑप्शन असले , तरी अभ्यास करताना कोणताही भाग ऑप्शनला टाकू नका. अभ्यास करताना जे जे अवघड वाटेल , ते ते शिक्षकांना विचारून शंका समाधान करून घ्या. अभ्यास करतानाच जर तुम्ही काही भाग ऑप्शनला टाकलात , तर हॉट्सचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. परीक्षेच्या वेळी , पाचपैकी कोणते चार अधिक चांगले येतात , ते पाहा आणि सोडवा. अभ्यासाला बसताना जेव्हा आपण ताजेतवाने असतो , तेव्हा आपला मेंदूसुद्धा अधिक तल्लख असतो. अशा वेळी म्हणजे थोडक्यात जेव्हा आपला अभ्यासाचा मूड असतो , तेव्हा सामान्यपणे आपल्याला आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्यास आपण सुरुवात करतो. तसे न करता जेव्हा अभ्यासाचा मूड असेल , तेव्हा कठीण वाटणाऱ्या विषयाने किंवा न येणाऱ्या टॉपिकने अभ्यासाची सुरुवात करा ; कारण , बराच वेळ अभ्यास केल्यावर , कंटाळा आल्यावर आपण कठीण विषय अभ्यासाला घेतला , तर आपला मेंदू अधिक ताण घेण्याच्या परिस्थितीत नसतो. परिणामी , लगेचच झोप येऊ शकते. रोजच्या दिनक्रमाचं व अभ्यासाचं वेळापत्रक बनवा. जे आपल्याला आचरणात आणता येईल , असंच वेळापत्रक तयार करा. उदाहरणार्थ , सकाळी किती वाजता उठणार , हे ठरवताना पहाटे उठावं , या सूत्रानुसार ' पहाटे पाच वाजता उठावे ' असे ठरवूच नका. कारण भल्या सकाळी उठणं तुम्हाला जमणार नाही हे तुम्हाला माहितेय. ' सकाळी सात वाजता उठणार ,' हेसुद्धा वेळापत्रक असू शकते. फक्त नंतरचा वेळ नीट हुशारीने वापरा. दिवसभरात किमान आठ ते दहा तास अभ्यास होईल आणि आपल्याला सोयीचे वाटेल , असे वेळापत्रक बनवा. महत्त्वाचे म्हणजे , जे ठरवाल , ते कठोरपणे आचरणात आणा. परीक्षा म्हटल्यावर अनेक प्रश्न पडतातच. त्यातलेच काही नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं खास मुंटाच्या विद्यार्थी मित्रांसाठी... उत्तरपत्रिकेवर आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक कुठे लिहायचा असतो ? पुरवणीवरही पण तो लिहायचा असतो का उत्तरपत्रिकेवर कुठेही आपलं नाव लिहायचं नसतं. पहिल्या पानावर एकाच ठिकाणी सही करायची असते. बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर असलेल्या ठराविक रकान्यातच , अंकांत आणि अक्षरांत लिहावयाचा असतो ; तसेच पुरवणीवरही ठराविक रकान्यातच बैठक क्रमांक लिहायचा असतो. इतर कोणत्याही ठिकाणी आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक चुकूनसुद्धा लिहू नका. प्रश्नपत्रिकेवर बैठक क्रमांक लिहायचा का प्रश्नपत्रिकेच्या वरील पानावर व प्रश्नपत्रिकेच्या आतील प्रत्येक पानाच्या उजव्या बाजूससुद्धा बैठक क्रमांक लिहायचा असतो. पर्यवेक्षकाची सही कुठे असते आपल्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर आणि प्रत्येक पुरवणीवर पर्यवेक्षकाची सही आहे , याची खात्री करा. उत्तरपत्रिकेत दोन्ही बाजूस समास सोडावा का उत्तरपत्रिकेत डाव्या बाजूस समास आखलेलाच असतो. त्यात केवळ प्रश्नक्रमांक व त्या खाली उपप्रश्न क्रमांक लिहावा. उत्तरपत्रिकेत आखलेल्या रेषा उजवीकडील बाजूस अगदी शेवटपर्यंत नसतात. साधारण उजवीकडील एक सेंटीमीटर जागा कोरी ठेवलेली असते. त्यात काही लिहू नका. वेगळा समास आखून जागा सोडण्याची आवश्यकता नाही. पुरवण्या किती घेता येतात ? पुरवण्यांवर क्रमांक लिहावे का ? - आपल्याला उत्तरे लिहिण्यासाठी आवश्यक तितक्या पुरवण्या घेता येतात , त्यास कोणतेही बंधन नाही. पुरवण्यांवर क्रमांक लिहिला , तरी चालेल. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर पुरवण्यांची संख्या लिहायची असते. पेपरच्या शेवटी करायचे हे काम असल्याने घाईमध्ये विसरू शकते. तसे न करता आठवणीने किती पुरवण्या जोडल्या , याचा आकडा न विसरता लिहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरवण्या क्रमाने बांधा. उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजावा का उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजला पाहिजे. केवळ ग्राफचा कागद जोडलेला असेल आणि एकही पुरवणी जोडली नसेल , तरी ग्राफच्या कागदासाठी एक पुरवणी अशी नोंद करा. पेपर लिहिण्यासाठी कोणत्या रंगाच्या शाईचं पेन वापरावं पेपर लिहिण्यासाठी निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईचे पेन , बॉल पेन किंवा जेल पेन वापरावे. यापैकी ज्या रंगाचं पेन वापरण्याचं ठरवाल , त्या एकाच रंगाचं पेन वापरावं. दोन वेगवेगळ्या रंगांची पेन्स वापरू नयेत. निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनशिवाय इतर कोणत्याही रंगाच्या शाईचा वापर केल्यास पेपर तपासला जात नाही व गुणही दिले जात नाहीत. रफ वर्क म्हणजे कच्चं लिखाण करण्यासाठी वेगळे कागद मिळतात का ? नसल्यास कच्चे लिखाण कुठे करावं रफ वर्क करण्यासाठी सुटे वेगळे कागद मिळत नाहीत ; पण रफ वर्क प्रश्नपत्रिकेवर करू नका. रफ वर्क उत्तरपत्रिकेतच करायचं असतं. ते उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानांवर करावे. रफ वर्क पेनने करू नये ; ते पेन्सिलनेच करायचे असते. ज्या पानावर रफ वर्क कराल , त्या पानाच्या वर तसे नमूद करा. उत्तरं लिहिताना एका खाली एक अशी लिहावीत का उत्तरपत्रिका पाठपोट २० पानांची असते. उत्तरपत्रिका मिळाल्यावर ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पाने असल्याची खात्री करून घ्या. उत्तरे लिहिताना प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. प्रश्नातील उपप्रश्नाचे उत्तर मात्र एका खाली एक त्याच पानावर लिहावे. उत्तर लिहिताना समासामध्ये प्रत्येक उपप्रश्नाचा क्रमांक नीट लिहावा. समासात प्रश्न किंवा उपप्रश्नाचा क्रमांक लिहिण्यासाठी वेगळ्या रंगाच्या शाईचे पेन वापरू नये. अभ्यासासाठी योग्य वेळ कोणती ? पहाटे , दुपारी की रात्र अभ्यास कोणत्या वेळी करावा , ते प्रत्येकानं ठरवावं आणि आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करावा. दुपारी अभ्यास होत नाही , तर संध्याकाळी करा , रात्री करा , पहाटे उठून करू शकता. पण दिवसभरात मिळून ८ ते १० तास अभ्यास होईल , हे पाहा. मी जिंकणारच परीक्षा अगदी जवळ आलीय , कितीही केला तरी अजून खूप अभ्यास बाकी आहे , या विचाराने मानसिक ताण येणं स्वाभाविक आहे ; पण राहिलेल्या अभ्यासाचा मानसिक ताण घेऊन जर अभ्यास करत असाल , तर वेळही वाया जाईल आणि अभ्यासही होणार नाही. परीक्षा जवळ आल्याचा स्वाभाविक ताण असू द्या ; पण अनाठायी मानसिक ताण घेऊ नका. या उलट किती अभ्यास राहिलाय , किती झालाय याचा अंदाज घेऊन राहिलेल्या अभ्यासाचं व दिवसांचं नियोजन करा आणि माझा अभ्यास ठराविक वेळेत मी पूर्ण करणारच , या मानसिकतेत अभ्यास करायला बसा. ' मला जमणार आहे. मी चांगले मार्क मिळवणार आहे ,' असे सकारात्मक विचार मनात ठेवा म्हणजे मानसिक ताणाशिवाय चांगला अभ्यास होईल. बऱ्याच वेळा अभ्यास करायला सुरुवात केली , की झोप येऊ लागते. याचे कारण तो विषय कंटाळवाणा नसून , आपला मेंदू थकलेला असतो , हे ध्यानात घ्या. आपल्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही , तर मेंदू लवकर थकतो. त्यामुळे अभ्यास करताना झोप आली , तर थोडी हालचाल करा , उड्या मारा , थोडे चाला. एका जागेवर बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. व्यायाम करण्याने , चालण्याने , धावण्याने ; थोडक्यात हालचाल केल्याने मेंदू पुन्हा तरतरीत होतो. परीक्षा जवळ येईल , तशी झोप कमी करून जागरणं करून अभ्यास करू नका. पुरेशी झोप घेणंसुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आपण जेव्हा झोपतो , तेव्हा मेंदूला विश्रांती तर मिळतेच ; पण झोपेच्या काळात मेंदू दिवसभरात जमा केलेल्या ज्ञानाचे , माहितीचे विश्लेषण करून त्याचे वर्गीकरण करत असतो. केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी हे आवश्यक असते.मुलांचा अभ्यास कसा घ्याल ?मुलांचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय दृष्टीनं साधयला हवा; यातूनच स्वावलंबनम सहकार्य, श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील. मूल हे शिक्षणचे केन्द्र आहे, व अभ्यासक्रम हे संस्कृतीसंवर्धनाचे साधन आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन बालविकास साधण्यासाठी शिक्षण संस्था आहेत. पालक प्रयत्नशील आहेत. समाजयंत्रणा योजना आखीत आहेत. पण या सर्व गोष्टी मुलाभोवती त्याच्या भावी जीवनाची पूर्वतयारी करण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत. याची जाणीव शिक्षकांना, पालकांना असेल तरच बाळांची उत्तम जडणघडण होऊ शकेल.शाळेत येण्यापूर्वी मूल कोऱ्या पाटीप्रमाणे येत  नाही. वऱ्याचशा गोष्टी त्याने मिळवलेल्या सतात. जन्मल्यापासून मूल शिकतच असते. त्याला मदत करणे एवढेच पालकांचे, शिक्षकांचे काम आहे. पालकाला मोकळेपणी शिकू देणे, त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचण दूर करणे एवढेच काम आपले. मूल हे घरात राजा असते; त्याला सत्ता साऱ्या घरात चालते. त्याचे सिंहासन म्हणजे आईची कटी असते. राजा घरात हुकूम सोडतो. सर्वांना ते पाळावे लागतात. पण एकदा का मूल शाळेत गेले म्हणजे शाळेत त्याला शिक्षकाचे ऐकावे लागते. दुसऱ्याचे हुकूम पाळणे मुलाला भाग पडते, मूल गांगरून जाते. म्हणून आरंभी घर व शाळा हा दुवा जितक्या उत्कृष्ट तऱ्हेने सांधला जाईल तितका शिक्षणाचा पाया नकळत दृढ होत जाईल. म्हणूनच ही खबरदारी घेणारा शिक्षक मुलाचा खरा विकास साधू शकेलमानसशास्त्रीय प्रगतशिक्षणपद्धतीबालमनाचे अवगाहन करून निरोगी वातावरणात पालकांचा सर्वांगीण विकास साधणे ही मानसशास्त्रीय दृष्टी समाजाला फार उशिरा आली. मानसशास्त्रदृष्ट्या जुन्याकाळी शिक्षणाकडे पाहिले जात नसे. मूल हे मोठ्या माण्सापेक्षा वेगळे आहे ही कल्पना काही वर्षापूर्वी नव्हती. प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ रुसो या फ्रेंच विद्वानाने ही कल्पना सर्व जगापुढे मांडली. त्याने मुलांचा अभ्यास तयार होतो. ही नैसर्गिक पद्धत प्रथम लोकांपुढे मांडली. स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध विद्वान पेस्टालॉजी व त्याचा शिष्य फ्रोबेल यांनी या द्रुष्टीने विचार करून किंडन गार्डनपद्धत सुरू केली. मुलाचा विकास निव्वळ माहिती देण्याने होत नाही. तर त्याला अनुभव यायला पाहिजे ही गोष्ट या शिक्षणशास्त्रज्ञाने जगालापटवून दिली शिक्षण पद्धतीत शिक्षकाचे महत्त्व कमी झाले व मुलांचे महत्त्व वाढत गेले. हा पहिला मोठा फरक पडला. मुलांच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा विकास होणे हे या शिक्षण विषयक कल्पनेचे परिणत स्वरूप होय.स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले शिक्षणाविषयक विचार चिंतनीय आहेत. शिक्षण म्हणजे ज्ञा देणे अगर माहितीचा प्रसार करणे नव्हे तर मानवाच्या अंतःकरणात खोलवर दडलेल्या एका आत्मीक शक्तीवर पोचण्याचे सामर्थ्यमानवाला प्राप्त होण्याप्रत त्याला आंतरमनाचा विचार करण्यास प्रवृत्त करणे, त्यामधून जो मनुष्य तयार होतो तो पूर्णत्वाला पोचलेला असतो, देवत्व प्राप्त झालेले असणे. प्लेटो या थोर महात्म्याने सांगितले आहे की शरीराचा विकास व्हावयास पाहिजे तर शरीराच्या निरनिराळ्य़ा अवयवास काम मिळाले पाहिजे.ही शिक्षणाची दृष्टी महात्मा गांधीच्या शिक्षणपद्ध्तीत उघड दिसून येते. निसर्ग, समाज व उद्योग ही ज्ञानाची भांडारे आहेत. त्यांच्या मधील ज्ञन केवळ, पुस्तकांच्या साहाय्याने न देता ते पक्के होते. ही गोष्ट विचारवंताना पटलेले आहे. त्यातही मुलाला मोठं महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.प्रगत शिक्षणाचा विचार करता असे दिसून येईल की, नाट्य, काव्य, नृत्य, निसर्गदर्शन, खेळ, छंद इत्यादींनी मुलाभोवती मन मोकळे वातावरण निर्माण होते; व मुलांचा सर्वांगीण विकास होतो. वरील गोष्टी तात्त्विक दृष्टीने मांडलेल्या दिसतील पण सद्यःपरिस्थितीत अभ्यासक्रम, पुस्तके, शालेय शिस्त परीक्षा परीक्षेतील गुण यावर  भावी जीवनाकडे दृष्टी ठेवून पालक शिक्षक मुलांचा अभ्यास पुरा करून घेणे त्यांच्या व्यवहारी जीवनाकडे दृष्टी ठेवणे, अशा अनेक समस्या समाजापुढे आहेत; त्याकरिता सरकारी यत्रणेने शाळा शिक्षक शिक्षणपद्धती, परीक्षा पद्धती वगैरे बाबतीत केलेले नियम आणि वर निर्देशित केलेली पालकांच्या विकासाची द्रुष्टी यांचा मेळ घालताना मुलांचा विचार, मुलांचे समाधान मुलांची प्रगती मुलांची जिद्द, समाजात माणूस म्हणून त्याचा जगण्याचा हक्क दुसऱ्याच्या हितात आनंद मानण्याची व्रुत्ती त्याच्या अंगी बाणणे म्हणजेच खरा माणूस होणे या द्रुष्टीने आज शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शन पाहिजे. शिक्षक शाळेत तासन्तास शिकवतो. पालकांचा मुलागागे अभ्यासाचा तगादा या गोष्टींनी नकळत मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तीकडे दुर्लक्ष होण्याचा केव्हा केव्हा धोका निर्माण होतो.जन्मापासूनचे अनुभव हेही एक शिक्षणचशालेय अभ्यासक्रम तयार करणारी माणसे सूज्ञ असतात. अभ्यासक्रमाला पोषक अशी पुस्तके बनाणाऱ्या मंडळातील सभासदांचा लहान मुलांशी किती संबंध येतो याचाही विचार करायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षकाने फार मोठ्या जबाबदारीने काम केले पाहिजे. पालकांनी अभ्यास करून घेणे याबरोब्रच मुलांचे समाधान कायम ठेवणे, त्यांच्या आनंदात कमतरता होऊ न देणे, कोणत्याही थरातील मूल असले तरी त्याला कमी न लेखणे मूल बालरूपी परमेश्वर आहे या गोष्टीवर श्रद्धा असणे या गोष्टी तलमळीने साधल्या तर मुलांकडून पालकांच्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या साध्य झाल्याशिवाय राहणार नाहीत.प्रस्तुत लेखकाने गेली ६० वर्षे अव्याहत सर्व थरातील मुलांशी आपला बराच संपर्क साधला, व कोठलेही मूल मागे पडत नाही याचा अनुभव घेतला. हलक्या वाटणाऱ्या थरातील मूल श्रेष्ठत्वाला गेलेले पाहण्याचे भाग्य मिळवले. आणि म्हणून शिकवणे, अभ्यास करून घेणे ही गोष्ट ग्रहण नाही. मुलालाशिकू देणे, दक्षतेने त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचणी दूर करणे, क्षणोक्षणी त्याची वृत्ती समाधानी ठेवणे, त्याच्या आनंदी वृत्तीत स्वतः समाधान मानणे एवढ्या गोष्टी साधल्या म्हणजे अभ्यासक्रम कोणताही असो, पुस्तके कोणतीही असोत, शैक्षणिक बंधने असोत. तरी पोटच्या मुलाकडे ज्या दृष्टीने आई पाहते ती दृष्टीच शिक्षणाचे साध्य साधते.मूल जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून स्वतः शिकतच असते. निरीक्षण, अनुभव, कल्पना, विचार व निर्णय ही पंचपदी मुलाला शिक्षण तेत असते. जन्मल्यापासून मूल भाषा शिकते, गणित शिकते सामान्यज्ञानही शिकते. आजच्या कोणताही विषय शिकत असते. ही गोष्ट जिव्हाळ्याच्या शिक्षकाला सतत दिसून येते. मुलाच्या मानसिक शक्ति वाढण्यास त्याच्या स्वाभिमानास धक्का लागता कामा नये हे व्रत संबंधितांनी पाळले पाहिजे. स्वाभिमानात शीला उगम आहे. पालक सच्छील बनण्यास मदत करणे त्याचा स्वाभिमान राखला तरच शक्य आहे. त्याप्रमाणेच पालकाला काही छंद असतात. छांदात विकासाचे केन्द्र साठविलेले असते. बालकांचे छंद जोपासले पाहिजेत व त्यातून त्याची प्रगत्ती नकळत साधली पाहिजे. यासाठी संबंधितांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे.मुलांना आपण शाळेत पाटवतो, मुले पुस्तकातून शिकतात. तयार करून परीक्षा पास होतात. ही परंपरा चाललीच आहे.पण यातून साधावयाचे काय ?मुलांचा विकास कोणत्या गोष्टीत झाला पाहिजे ते सदैव दृष्टीसमोर ठेवणे पाहिजे. मुलांचा शारीरिक बौद्धिक मानसिक, नैतिक, सामाजिक, सांस्कृविकास राष्ट्रीय दृष्टीने साधला गेला पाहिजे. हे सदैव मुलांभोवती असणारांनी आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्यातूनच स्वावलंबन सहकार्य श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील अशी खबरदारी घेतली पाहिजे. नकळत ती त्यांच्या अंगी उतरली पाहिजेत. मुलांना सदोदित त्यांच्या आवडीच्या विषयाट ठेवणे स्वच्छता राखणे वगैरे बाबतीत मुले आई-वडलांस मदत करण्यास उत्सुक असतात. त्यांचा तो उत्साह कमी होऊ नये. मूल जास्तीत जास्त आईवडिलांच्या सहवासात असले पाहिजे. पालकांनी मुलांना आपले भांडवल करू नये. म्हणजे पालकांच्या मताप्रमाणे  मुलाने डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे व्हावे अशी पालकांनी त्यांच्या वर शक्ती करू नये. मुलांना आवडेल तो पेशा पत्करण्याची त्यांना मुभा द्यावी. असे झाले तरच मुलांचा खरा विकास साधून तो राष्ट्राचा उपयुक्त घटक बसू शकेल. शाळेत मूल आल्यापासून शिक्षकांनीही पुधील गोष्टी नजरेसमोर ठेवल्या पाहिजेत. आजच्या लेखात लहान मुलांचा प्रश्न आहे म्हणून ओझरते लिहिण्याचे धाडस करतो.खर पाहिले तर शाळा ही शिशूवर्गापासून एस.एस.सी. पर्यंत एकसंच असली पाहिजे. तरच बालकाच्या शिक्षणाची साखळी पूर्ण होऊ शकेल.पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक असे वेगळे खंड असू नये. एकसंच शाळा बालकांची जलदगतीने प्रगती साधू शकतात मुलांत शक्ती निर्माण करतात. निर्भयवृत्तीने मूल सामर्थ्यवान बनते. शिशूवर्ग व पहिली या दोन वर्गात मुलांना शाळेचे आकर्षण वाटेल असे वातावरण तयार झाले पाहिजे. दुसरी, तिसरी या दोन वर्गात म्हणजे मुले ७/८ वर्षांची होई पर्यंत आकर्षणाबरोबरच अभ्यासाची गोडी निर्माण पाहिजे. चौथी ते सातवी या वर्गात शिक्षणाची बैठक घातली गेली पाहिजे. त्याच्या पुढील वर्गात मूठ स्वाध्यायाने शिकण्यास सामर्थ्यवान बनले पाहिजे. त्यानंतर मुलाच्या मनाप्रमाणे त्याला शिकू देणे, मूल चारित्र्यवान बनेल. आपले जीवन समृद्ध करील, या बाबतील लक्ष ठेवणे, संयमाचा त्याला आकार देणे त्याचा द्रुष्टीकोण विशाल बनवणे हे साधले म्हणजे शाळेत व घरात शिक्षकांनी व पालकांनी अभ्यास कसा करून घ्याला याचा उलगडा आपोआप होईल.मूल हे घराचा बहुमोल अलंकार  आहे. व राष्ट्राचा खराखुरा आधारस्तंभ आहे या दोन गोष्टी सदैव नजरेसमोर असल्या म्हणजे सर्व काही साधेल, या गोष्टींवर श्रद्धा असावी.(अभ्यास आणि व्यायाम या दोन्हीही गोष्टी मुलांकडून करून घेणं आवश्यक आहे. ) (खरी ईश्वरसेवा  :- आपल्या मुलांचं पालनपोषण करणं हीच स्त्रीची ईश्वरसेवा होय. आपल्या मुलांच्याद्वारेच ती ईश्वराची सेवा करीत असते. मुलांना जन्म देणं, त्यांचं पालनपोषन करणं याबरोबरच त्यांना सत्य, मानवतेची शिकवणूक देणं हेच तिचं परमकर्तव्य होय. काउंट लिओ टॉल्सटाय )  अभ्यास केला; पण लक्षातच राहिला नाही, अशी ओरड खूप वेळा ऐकायला मिळते. त्याचे मुख्य कारण अभ्यास करताना स्मरण-सराव या काही गोष्टींचा उपयोग आपण करत नाही. काय केल्यास अभ्यास लक्षात राहतो? याबद्दल - माणसाचा मेंदू हा एखाद्या कॉम्प्युटरप्रमाणे आहे. यामध्ये साठविलेल्या माहितीचा योग्य वापर आपण करायला हवा. तुमच्या जवळ असलेल्या अभ्यास विषयांची माहिती म्हणजे कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचे तर तो तुमचा डेटा आहे. हा एवढा मोठा डेटा विषयांनुरूप कसा लक्षात ठेवायचा या प्रश्‍नाचं दडपण तुमच्या मनावर असेल. हे लक्षात ठेवणं आणि लक्षात ठेवलेलं योग्य वेळी स्मरण होणं यासाठी काय करायचं, हे आपण पाहणार आहोत. स्मरणाचा राजमार्ग स्वाध्याय या शब्दातील स्व हा शब्द महत्त्वाचा आहे. तुमच्या जवळ असलेली विषयवार माहिती म्हणजेच ज्ञान नव्हे. तुम्ही स्वतः आपल्या मनात त्या माहितीचे ज्ञानात कसे रूपांतर करता याला महत्त्व आहे. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठीच्या आकलनाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण स्वाध्यायातून ते प्रयत्नपूर्वक सुधारता येते. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. ट्रायल अँड एरर किंवा प्रयत्न-प्रमाद पद्धती असे त्याला म्हणतात. स्वतःच माहितीतील तत्त्व शोधणे आणि त्यासाठी स्वतःलाच मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वावलंबनाची भावना बळावते. आत्मविश्‍वास वाढतो. विषय लक्षात ठेवणेही सोपे जाते. सोप्याकडून अवघडाकडे आपल्याला येत असलेल्या सोप्या गोष्टींचा अवघड गोष्टी समजण्यासाठी उपयोग करा. एखादे गणित सोडवायचे असेल, तर त्याची पद्धत समजावून घ्या. स्वतः तयारीनिशी सोडवायला सुरवात करा. स्वतः झगडा, चुकले तरी निराश न होता आपला मित्र, शिक्षक यांना न लाजता आपली अडचण विचारा. नेमकी युक्ती काय ती समजावून घ्या. गणित विषय अवघड वाटतो; पण त्याच्या युक्‍त्या कळल्या की तो सोपा होतो. स्वकष्टाने मिळविलेली ही युक्ती म्हणजे ज्ञान किंवा मर्म. हे मर्म समजणे अतिशय प्रेरणादायी असते. सामान्याकडून सिद्धान्ताकडे विज्ञान विषयांचा अभ्यास सोपा होण्यासाठी आणि लक्षात राहण्यासाठी केवळ पाठांतर किंवा पोपटपंची उपयोगाची नाही. निरीक्षण करणे, त्यावरून अनुमान काढणे, प्रयोग पद्धती समजावून घेणे आणि आपण स्वतः केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष कसे काढले हे लक्षपूर्वक आठवा. यावरून काढलेला विज्ञानाचा सिद्धान्त आठवा आणि मग तो पाठ करा. मेंदूत वैज्ञानिक ज्ञानाची रचना ही अशी मांडणी करून लक्षात ठेवायला हवी. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयासाठी केलेले प्रयोग हे केवळ जर्नल भरण्यासाठी नाहीत, तर आपली तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आहेत, हे समजून घ्या कारण - हे तत्त्व शिक्षणात आणि स्वाध्यायात म्हणजेच अभ्यासात आपले ब्रीद असावे. त्यामुळे "स्मरण' सुलभ होते. कौशल्य सारे रचनेत आहे, असे म्हणतात. मेंदूतील विषयवार डेटामधून प्रश्‍नाच्या अनुरोधाने त्या त्या मुद्द्यानुसार उत्तर तयार करणे, म्हणजेच सुसंगत तर्कशुद्ध मांडणी करणे. सरावात सातत्य ठेवा अभ्यास या शब्दाची फोड केली तरी सरावात सातत्य किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. अ = अविरत करावा लागणारा, भ= भयमुक्त करणारा, स = सहेतुक केलेला. यामुळेच तुमच्या दैनंदिन जीवनातील वेळापत्रकाचा मुख्य अजेंडा सातत्यपूर्ण प्रयत्न हा आहे. त्यासाठी 24 पैकी 12 तास आपण सरावासाठी ठेवायला हवेत. त्यावर जानेवारी आणि परीक्षेपर्यंतचे आठवडे अत्यंत शांत चित्ताने अंमलबजावणी केलीत तर तुम्ही परीक्षेच्या दडपणातून मुक्त व्हाल आणि अभ्यास अतिशय सोपा होईल आणि तुम्हाला परीक्षेचे भय अजिबात वाटणार नाही. सहेतुक म्हणजे आपल्याला पेपर तपासणाऱ्यांकडून मार्क मिळवायचे आहेत. त्यामुळे तो हेतू डोळ्यांसमोर असेल तर उत्तराचा दर्जा निश्‍चितच चांगला होईल. परीक्षकाला आपले गुण कापताच येणार नाहीत. एवढे दर्जेदार आपले उत्तर हवे. त्यामुळे प्रत्येक प्रश्‍नाचे अपेक्षित असेच उत्तर तुमच्याकडून जायला हवे, म्हणजे काम फत्ते! मग करणार ना सराव. 

अभ्यास कसा करावा ? अभ्यास कसा करावा ? Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.